।। सुमंगल सुविधा ।।
विवाह संस्था, पुणे
संचालक : ज्योतिषपंडित डॉ. सुधीर दाते
 
ब्राह्मण विवाहसंस्था परिवारातील संस्था
प्रवर्तक : ज्योतिषपंडित डॉ. सुधीर दाते

विवाहविषयक अनेक उपक्रम करणारी एकमेव संस्था
स्थापना : जानेवारी २००६

Latest Event Details

-: विनम्र आवाहन :-

            सर्व वधू-वर, पालक 
आणि 
सर्व 
ब्राह्मण विवाह संस्था चालक 
ह्यांच्यासाठी 
विनम्र आवाहन. 
          'ब्राह्मण विवाह संस्था परिवार' हा नवीन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. अनेक विवाह संस्थांचा हा परिवार आहे. 
           ह्या उपक्रमामुळे वधूवर, पालक आणि विवाह संस्थासुद्धा ह्यांना अनेक लाभ मिळणार आहेत.  :-
१) परिवारातील कोणत्याही एका संस्थेत नाव नोंदणी केली तरी सर्व संस्थांमध्ये नोंदविल्या जाणाऱ्या सर्व स्थळाची माहिती उपलब्ध होईल. म्हणजेच अनेक संस्थांमध्ये नाव नोंदणी करण्याची गरज राहणार नाही. अर्थात आर्थिक बचत होईल. 
२) निरनिराळ्या संस्थांमध्ये नाव नोंदविल्यास त्यांच्याशी निरनिराळा संपर्क साधून स्थळे मिळवावी लागतात. परंतु अनेकवेळा तीच तीच स्थळे पाहायला मिळतात. ती ह्या योजनेत दिसत नाहीत. 
३) कोणत्याही संस्थेस परिवारातील सर्व स्थळांचा साठा उपलब्ध होतो. 
४} वधूवर मेळाव्यात अन्य संस्थेने दिलेल्या छापील  यादीतील स्थळांना संपर्क साधण्याचे काम नाहीसे होते. हा सर्व संस्थांना मिळणारा सरसकट लाभ आहे. 
५) मेळाव्यानंतर इतर संस्थांना छापील याद्या द्याव्या लागताच नाहीत. 
हे असे लाभ मिळवून धरणाऱ्या ह्या महत्त्वाकांक्षी योजनेत आपण अवश्य सहभागी व्हावे. ही नम्र विनंती. 
प्रवर्तक  :- ज्योतिषपंडित डॉ. सुधीर दाते, पुणे  

संपर्क :- ज्योतिषपंडित डॉ. सुधीर दाते ,  
मोबाईल : ९४२३००९६५२. 
 

वधूवर कुंडलीमेलन संपूर्ण अहवाल

विवाह जमविताना कुंडलीमेलन कसे करावे ह्या विषयी सामान्य जनमानसात तर अज्ञान आहेच परंतु ज्योतिषाच्यातही मतांतर, संदिग्धता आणि त्याच कारणाने एकवाक्यता नसणे ही प्रकर्षाने जाणवणारी परिस्थिती आहे हे माझे अनुभवाअंती ठाम मत झाले आहे. ह्यावर उपाय शोधण्याच्या चिंतनातून तर्क संगत शास्त्रशुध्द प्रणाली निर्माण करण्याच्या माझ्या प्रयत्नांना यश आले असे अनुभवाअंती मला मनापासून वाटते. ही प्रणाली नक्की काय आहे ह्याचे संपूर्ण वर्णन माझ्या ‘वधू-वर कुंडलीमेलन (शास्त्रशुध्द पध्दती)’ पुस्तिकेत आले आहे.

त्यातील विवेचनानुसार चांद्रराशिवर आधारित ‘वैयक्तिक गुणमेलन कोष्टके’ आता पूर्णपणे स्थिरावली आहेत. हजाराहून अधिक जातकांनी त्यांचा उपयोग समाधानकारक झाल्याच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया प्रगट केल्या ह्यातच त्यांची उपयुक्तता सिध्द झाली.

ह्याच पुस्तिकेतील वर्णनानुसार दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यांच्या तंत्रशुध्द तपासणीसाठी ‘संपूर्ण अहवाल’ कसा असावा हे ह्या अहवालावरून सहज लक्षात येईल. अहवाल बनविताना निरनिराळे मुद्दे व त्यानुसार निष्कर्ष काढण्याची शिस्तबध्द प्रणाली ही सहज समजावी अशी सोपी करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे.

आता ह्या प्रणालीतील दुसऱ्या टप्प्यात, दर्शविलेल्या तक्त्यांमधे चार भावेशसंबंध पुस्तिकेतील वर्णनानुसार तपासलेले दिसतात. परंतु त्यानंतरसुध्दा अजून एक कोष्टक नंतर समाविष्ट करण्यात आले आहे. रविपासून राहूपर्यंत ग्रहांचे संबंध तपासणेही मला भावेशांइतकेच महत्त्वाचे वाटले.

पत्रिका बघण्याच्या मूळच्या दृष्टीकोनानुसार वधू-वरांपैकी एकाच्या पत्रिकेत एखादे स्थान अशक्त असेल तर दुसऱ्याच्या सशक्तपणाचा फायदा त्यास उपयुक्त ठरला पाहिजे. ही संकल्पना भावेशसंबंधांवर आधारित आहे. त्याचप्रमाणे इतर ग्रहांच्या बाबतीतही अपेक्षा करणे अवाजवी नाही हे माझे प्रांजल मत. कारकत्व असते. मग त्यांचे संबंध तपासणेसुध्दा तर्क संगतच. निदान चंद्र, रवि, मंगळ, गुरू व शनि ह्या प्रमुख ग्रहांचे संबंध तरी योग्य हवेतच. ह्या पैकी चंद्राची तपासणी पूर्वी झालेली असतेच.

माझ्याकडे येणारे जातक एक शंका नेहमी उपस्थित करतात की, गुणमेलन कोष्टकात तपासले जाणारेच मुद्दे संपूर्ण अहवालात परत का तपासले जातात? त्याचे उत्तर असे आहे की, वधू-वरांपैकी नवी मिळालेली पत्रिका चुकीची आहे की काय ह्याची तपासणी होणे हेही जातकास ज्योतिषशास्त्राबाबत असणाऱ्या अज्ञानामुळे आवश्यक ठरते. ह्या उत्तरावर प्रतिप्रश्न हमखास विचारला जातो तो म्हणजे ‘मग संपूर्ण अहवालच सुरूवातीस का करू नये ? प्रत्येक स्थळाच्यावेळी असा अहवाल करायचा ठरविण्याची आवश्यकता नसते. कारण प्रत्येक स्थळ आपल्या परिचयाचे, अपेक्षांमधे बसणारे आणि सोयरिक जोडण्यास लायक असे शुभग्रहयोगयुक्त असतेच असे नाही. त्याशिवाय हा अहवाल बनविणे ही प्रक्रिया खरोखरीच जिकीरीची असल्याने त्याचे निर्मिती मूल्य प्रत्येक वेळेस खर्च करणे जातकास परवडणारे नसते. म्हणून जोडीदार निश्चितीची शक्यता निर्माण झाल्यावरच असा अहवाल करणे योग्य आहे.

ह्या सर्व संशोधनसिध्द प्रणालीनुसार केलेला हा अहवाल खरोखरीच किती उपयुक्त आहे हे आता आपल्याला समजले असावे अशी मी आशा करतो.

असा अहवाल बनविण्याचे निर्मितीमूल्य ९०० रुपये आहे. त्यासाठी
पुढील माहिती भरून द्यावी.

फॉर्म भरण्यासाठी "Click Here"

-ज्योतिषपंडित सुधीर गोविंद दाते.
 
 
 

Copyrights 2012. All Rights Reserved सुमंगल सुविधा विवाह संस्था  Website Designed and Developed by Kalpak Solutions