।। सुमंगल सुविधा ।।
विवाह संस्था, पुणे
संचालक : ज्योतिषपंडित डॉ. सुधीर दाते
 
ब्राह्मण विवाहसंस्था परिवारातील संस्था
प्रवर्तक : ज्योतिषपंडित डॉ. सुधीर दाते

विवाहविषयक अनेक उपक्रम करणारी एकमेव संस्था
स्थापना : जानेवारी २००६

Latest Event Details

-: विनम्र आवाहन :-

            सर्व वधू-वर, पालक 
आणि 
सर्व 
ब्राह्मण विवाह संस्था चालक 
ह्यांच्यासाठी 
विनम्र आवाहन. 
          'ब्राह्मण विवाह संस्था परिवार' हा नवीन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. अनेक विवाह संस्थांचा हा परिवार आहे. 
           ह्या उपक्रमामुळे वधूवर, पालक आणि विवाह संस्थासुद्धा ह्यांना अनेक लाभ मिळणार आहेत.  :-
१) परिवारातील कोणत्याही एका संस्थेत नाव नोंदणी केली तरी सर्व संस्थांमध्ये नोंदविल्या जाणाऱ्या सर्व स्थळाची माहिती उपलब्ध होईल. म्हणजेच अनेक संस्थांमध्ये नाव नोंदणी करण्याची गरज राहणार नाही. अर्थात आर्थिक बचत होईल. 
२) निरनिराळ्या संस्थांमध्ये नाव नोंदविल्यास त्यांच्याशी निरनिराळा संपर्क साधून स्थळे मिळवावी लागतात. परंतु अनेकवेळा तीच तीच स्थळे पाहायला मिळतात. ती ह्या योजनेत दिसत नाहीत. 
३) कोणत्याही संस्थेस परिवारातील सर्व स्थळांचा साठा उपलब्ध होतो. 
४} वधूवर मेळाव्यात अन्य संस्थेने दिलेल्या छापील  यादीतील स्थळांना संपर्क साधण्याचे काम नाहीसे होते. हा सर्व संस्थांना मिळणारा सरसकट लाभ आहे. 
५) मेळाव्यानंतर इतर संस्थांना छापील याद्या द्याव्या लागताच नाहीत. 
हे असे लाभ मिळवून धरणाऱ्या ह्या महत्त्वाकांक्षी योजनेत आपण अवश्य सहभागी व्हावे. ही नम्र विनंती. 
प्रवर्तक  :- ज्योतिषपंडित डॉ. सुधीर दाते, पुणे  

संपर्क :- ज्योतिषपंडित डॉ. सुधीर दाते ,  
मोबाईल : ९४२३००९६५२. 
 

                : विवाहपूर्व मार्गदर्शन व समुपदेशन :

            नववधूचे कुटुंबात सून म्हणून पदार्पण झाल्यापासून त्या घरातील वातावरण बदलण्यास सुरुवात होते. ज्यांच्या घरात ती सहज रुळते त्यांच्या घरात समाधान नांदते. ती सून गृहलक्ष्मी म्हणून खरोखर शोभते.
 
       पण ही अपेक्षा सर्वांचीच पूर्ण होते असे नाही. अपेक्षाभंग झाल्यास परिस्थितीशी जुळवून घेणे सर्वांना जमतेच असे नाही. आणि समजा अहंकारामुळे जुळवून घेण्यास कोणीच तयार नसेल तर…..?
 
          बदलत्या काळात विवाह जमणे ही प्रक्रिया मूलत: ह्याच कारणामुळे क्लिष्ट बनत चालली आहे हे सर्व ज्ञात आहेच. अशावेळेस वधूवरांना किंवा काहीवेळा पालकांनासुध्दा समुपदेशनाची गरज असते हे आमचा अनुभव सांगतो.
 
          ह्यावर उपाय काय ह्याचा विचार मी केला तेव्हा माझ्या लक्षात आले की, रोग झाल्यावर औषधपाणी करीत बसण्यापेक्षा तो होऊच नये ह्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
 
          हा विचार विवाह जमण्याच्या प्रक्रियेत सुरुवातीपासूनच अंमलात आणला तर यश हाती लागते हा माझा कमीत कमी २५ वर्षांचा अनुभव आहे. माझ्या आप्तेष्टांच्या कार्यांमधे माझ्या मार्गदर्शनाचा उपयोग केला गेला त्यांचे सर्वांचे संसार सुरळीत चालले आहेत हे मी अभिमानाने सांगतो.
 
      पारंपारिक पध्दतीने पार पडलेल्या आणि माझा सहभाग असलेल्यांना शास्त्रशुध्द पध्दतीने  पत्रिका जुळणे पहाण्यापासून संपूर्ण कार्यसंयोजनापर्यंत माझा सल्ला उपयुक्त ठरला आहे. त्याच्याच बरोबर प्रेमविवाहांच्या बाबतीतही माझ्या कार्यपध्दतीचा उपयोग केला गेला आहे.
 
         ह्याच अनुभवाचा आणि विचारसरणीचा भांडवल म्हणून व्यावसायिक उपयोग करण्याचा मी येथे प्रयत्न करीत आहे. थोडीशी पूर्वीच्या काळच्या ‘मध्यस्धी’ सारखीच ही भूमिका आहे. फरक एवढाच की, दोन स्थळे एकमेकांना सुचविण्याचे कार्य मी करणार नसून स्थळांनी एकमेकांना संपर्क साधल्यानंतर माझी भूमिका अंमलात आणणे मला आवडते.
 
       ज्यांना ह्या विवाहपूर्व मार्गदर्शनाचा आणि ज्यांना गरज वाटते त्यांना समुपदेशनाचा उपयोग करावासा वाटेल त्यांना अवश्य संपर्क साधावा. तत्पूर्वी माझ्या ह्या श्रेत्रास उपयुक्त ठरलेल्या माझ्या गतजीवनातील कार्याचा अल्प परिचय साधकास असावा म्हणून येथे देत आहे.
 
        संस्थापक, संचालक डॉ. सुधीर दाते ह्यांच्या अनेक क्षेत्रातील योगदानांचा अल्पपरिचय 
     ‘ज्योतिष पंडित’ असून ज्योतिषविषयक चार विषयांच्या संशोधनाबद्दल ज्योतिष विश्व विद्यापीठ, ओंकारेश्वर मध्य प्रदेश यांचेकडून पीएच. डी. बहाल 
 
 स्थळसंशोधनास अत्यंत उपयुक्त ‘वैयक्तिक गुणमेलन कोष्टकां’ ची निर्मिती.
 
 वैवाहिक जीवन समाधानी होण्यासाठी अत्यंत उपयुक्त 
‘कुंडलीमेलन संपूर्ण अहवाला’ची निर्मिती.
 
 ज्योतिषविषयक विज्ञाननिष्ठ सल्ला व समुपदेशनासाठी प्रसिध्द.
 
 ज्योतिषविषयक अंधश्रध्दा, गैरसमजुती ह्यावरील 
प्रबोधनात्मक कार्यक्रमाची निर्मिती.
 
 ‘पंचमस्थान(संतती) व ‘सप्तमस्थान(वैवाहिक जीवन)’ विषयी 
उपयुक्त संशोधन व लेखन . 
 
 

Copyrights 2012. All Rights Reserved सुमंगल सुविधा विवाह संस्था  Website Designed and Developed by Kalpak Solutions