।। सुमंगल सुविधा ।।
विवाह संस्था, पुणे
संचालक : ज्योतिषपंडित डॉ. सुधीर दाते
 
ब्राह्मण विवाहसंस्था परिवारातील संस्था
प्रवर्तक : ज्योतिषपंडित डॉ. सुधीर दाते

विवाहविषयक अनेक उपक्रम करणारी एकमेव संस्था
स्थापना : जानेवारी २००६

Latest Event Details

-: विनम्र आवाहन :-

            सर्व वधू-वर, पालक 
आणि 
सर्व 
ब्राह्मण विवाह संस्था चालक 
ह्यांच्यासाठी 
विनम्र आवाहन. 
          'ब्राह्मण विवाह संस्था परिवार' हा नवीन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. अनेक विवाह संस्थांचा हा परिवार आहे. 
           ह्या उपक्रमामुळे वधूवर, पालक आणि विवाह संस्थासुद्धा ह्यांना अनेक लाभ मिळणार आहेत.  :-
१) परिवारातील कोणत्याही एका संस्थेत नाव नोंदणी केली तरी सर्व संस्थांमध्ये नोंदविल्या जाणाऱ्या सर्व स्थळाची माहिती उपलब्ध होईल. म्हणजेच अनेक संस्थांमध्ये नाव नोंदणी करण्याची गरज राहणार नाही. अर्थात आर्थिक बचत होईल. 
२) निरनिराळ्या संस्थांमध्ये नाव नोंदविल्यास त्यांच्याशी निरनिराळा संपर्क साधून स्थळे मिळवावी लागतात. परंतु अनेकवेळा तीच तीच स्थळे पाहायला मिळतात. ती ह्या योजनेत दिसत नाहीत. 
३) कोणत्याही संस्थेस परिवारातील सर्व स्थळांचा साठा उपलब्ध होतो. 
४} वधूवर मेळाव्यात अन्य संस्थेने दिलेल्या छापील  यादीतील स्थळांना संपर्क साधण्याचे काम नाहीसे होते. हा सर्व संस्थांना मिळणारा सरसकट लाभ आहे. 
५) मेळाव्यानंतर इतर संस्थांना छापील याद्या द्याव्या लागताच नाहीत. 
हे असे लाभ मिळवून धरणाऱ्या ह्या महत्त्वाकांक्षी योजनेत आपण अवश्य सहभागी व्हावे. ही नम्र विनंती. 
प्रवर्तक  :- ज्योतिषपंडित डॉ. सुधीर दाते, पुणे  

संपर्क :- ज्योतिषपंडित डॉ. सुधीर दाते ,  
मोबाईल : ९४२३००९६५२. 








 

सहस्त्रचंद्रदर्शन अहवाल

आपल्या कुटुंबातील प्रिय वडीलधारी व्यक्ती वयाची ८० वर्षे पूर्ण करते तेव्हा साहजिकच सहस्त्रचंद्रदर्शन विधी करावा व आपला त्या व्यक्तीबद्दलचा आदर, आपले प्रेम, त्यांनी आपल्यासाठी आयुष्यभर घेतलेल्या कष्टांबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी अशी इच्छा कुटुंबियांच्या मनात खचितच निर्माण होत असते. परंतु नक्की कधी हा विधी करावा?  तसेच आयुष्यातील सहस्त्र चंद्र मोजण्याची आपली संस्कृती काय आहे ह्यासंबंधी मार्गदर्शन करणारे सापडतच नाहीत. मोघम माहिती देणारे बरेच असतात. ही परिस्थिती हेरून ह्या माहितीपत्रकाच्या निमित्ताने संपूर्ण माहिती येथे देत आहे.

मुस्लिम धर्मानुसार सांगितलेला ‘दुजका चाँद’ आणि हिंदू संस्कृतीनुसार महत्त्व दिलेला ‘शुध्द द्वितीयेचा चंद्र’ एकच आहे.

ह्याच चंद्राला महत्त्व का? तर अमावास्येस चंद्र दिसतच नाही. शुध्द प्रतिपदेस तो सूर्यापासून फारच जवळ म्हणजे फक्त १२ अंशांवर असल्याने त्याची अतिशय बारीक कोर सायंकाळी सूर्यास्तानंतर पश्चिमेस शोधावी लागते. दिसली तरी तेजस्वी आकर्षक तर मुळीच नसते.

दुसऱ्या दिवशी म्हणजे शुध्द द्वितीयेस मात्र त्यांच्यात २४ अंशाहून अधिक अंतर पडल्याने सायंकाळी सूर्यास्तानंतर बराच वेळ मनमोहक चंद्रकोरीचे दर्शन होत असते. ह्या चंद्रदर्शनालाच ‘चंद्रदर्शन’ असे संबोधतात. काही प्रसिध्द ज्योतिषीसुध्दा पौर्णिमेचे चंद्र मोजतात ते साफ चूक आहे. हेच ज्योतिषी ८० वर्षातील खग्रास चंद्रग्रहणांचाही समावेश मोजणीत करून आणि त्या दिवशी दोनदा चंद्रदर्शन मोजून केविलवाण्या विनोदात आणखीनच भर घालतात असा माझा अनुभव आहे. एक तर कोणतेही ग्रहण पृथ्वीवर सर्वत्र कधीच दिसत नसते. मग जेधे ग्रहण दिसतच नाही तेथील लोकांनी दोनदा चंद्रदर्शन का मोजायचे ह्याचे उत्तर मात्र तसे सांगणाऱ्यांकडे नसते. असो.

८० वर्षांची १२ पट म्हणजे ९६०. म्हणजे ९६० चांद्रमास ८० वर्षात होतात. त्यात ८० वर्षांच्या कालावधीतील साधारण ३२ अधिक मास मिळविल्यास एकूण ९९२ मास होतात. पुढील ८ मासांची कमतरता भरून काढण्यासाठी ८१व्या  वर्षातील साधारण ८ चांद्रमास मोजल्यास आयुष्यातील १००० चांद्रमास म्हणजेच त्या अनुषंगाने १००० शुध्द द्वितीया पूर्ण होत असतात.

आता ही मोजणी आपल्या कुटुंबातील मान्यवरांच्या बाबतीत नक्की कोणत्या दिवशी पूर्ण होणार हे माहिती झाल्यास किती कौतुक वाटेल?  त्या दिवशी संध्याकाळी आपले आजोबा किंवा आजी नक्की आपल्या आयुष्यातील १००० व्या शुध्द द्वितीयेच्या चंद्राचं दर्शन घेतील व कृतकृत्य होतील.

वरील विशेष दिवसासाठीचा प्रत्यक्ष गणितासह संपूर्ण अहवाल मी आत्तापर्यंत अनेकांना करून दिला आहे. अजूनही कोणास असा अहवाल करून हवा असेल तर माझ्याशी संपर्क साधायला हरकत नाही. मला फक्त आपल्या आजोबा किंवा आजींची जन्मतारीख, जन्मवेळ ही माहिती द्यावी लागेल. अर्थात करणावळ असणारच. साधारण १९३२ पासून वर्षातील जन्मतारखा असणाऱ्यांना हा आनंद उपभोगता येईल.

बनविण्याचे निर्मिती मूल्य २००  रु. आहे. त्यासाठी पुढील माहिती भरून द्यावी.

फॉर्म भरण्यासाठी "Click Here"




 
 
 

Copyrights 2012. All Rights Reserved सुमंगल सुविधा विवाह संस्था  Website Designed and Developed by Kalpak Solutions