।। सुमंगल सुविधा ।।
विवाह संस्था, पुणे
संचालक : ज्योतिषपंडित डॉ. सुधीर दाते
 
ब्राह्मण विवाहसंस्था परिवारातील संस्था
प्रवर्तक : ज्योतिषपंडित डॉ. सुधीर दाते

विवाहविषयक अनेक उपक्रम करणारी एकमेव संस्था
स्थापना : जानेवारी २००६

Latest Event Details

-: विनम्र आवाहन :-

            सर्व वधू-वर, पालक 
आणि 
सर्व 
ब्राह्मण विवाह संस्था चालक 
ह्यांच्यासाठी 
विनम्र आवाहन. 
          'ब्राह्मण विवाह संस्था परिवार' हा नवीन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. अनेक विवाह संस्थांचा हा परिवार आहे. 
           ह्या उपक्रमामुळे वधूवर, पालक आणि विवाह संस्थासुद्धा ह्यांना अनेक लाभ मिळणार आहेत.  :-
१) परिवारातील कोणत्याही एका संस्थेत नाव नोंदणी केली तरी सर्व संस्थांमध्ये नोंदविल्या जाणाऱ्या सर्व स्थळाची माहिती उपलब्ध होईल. म्हणजेच अनेक संस्थांमध्ये नाव नोंदणी करण्याची गरज राहणार नाही. अर्थात आर्थिक बचत होईल. 
२) निरनिराळ्या संस्थांमध्ये नाव नोंदविल्यास त्यांच्याशी निरनिराळा संपर्क साधून स्थळे मिळवावी लागतात. परंतु अनेकवेळा तीच तीच स्थळे पाहायला मिळतात. ती ह्या योजनेत दिसत नाहीत. 
३) कोणत्याही संस्थेस परिवारातील सर्व स्थळांचा साठा उपलब्ध होतो. 
४} वधूवर मेळाव्यात अन्य संस्थेने दिलेल्या छापील  यादीतील स्थळांना संपर्क साधण्याचे काम नाहीसे होते. हा सर्व संस्थांना मिळणारा सरसकट लाभ आहे. 
५) मेळाव्यानंतर इतर संस्थांना छापील याद्या द्याव्या लागताच नाहीत. 
हे असे लाभ मिळवून धरणाऱ्या ह्या महत्त्वाकांक्षी योजनेत आपण अवश्य सहभागी व्हावे. ही नम्र विनंती. 
प्रवर्तक  :- ज्योतिषपंडित डॉ. सुधीर दाते, पुणे  

संपर्क :- ज्योतिषपंडित डॉ. सुधीर दाते ,  
मोबाईल : ९४२३००९६५२. 
 

।। सुमंगल सुविधा ।। विवाह संस्था 

ब्राह्मण विवाह संस्था परिवाराची प्रवर्तक संस्था 

संस्थापक, संचालक ज्योतिषपंडित डॉ. सुधीर दाते 

ब्राह्मण विवाह संस्था परिवार

     आमचा परिवार वधूवर, पालकांच्या जास्तीत जास्त अपेक्षा पूर्ण करणारा आणि मुख्य म्हणजे विवाह विषयक ज्योतिषशास्त्रीय परिपूर्ण सल्ला देणारा एकमेव परिवार आहे. ह्या परिवाराशी निगडीत अनेक संस्था असून दिवसेंदिवस अनेक अन्य संस्था आमच्या परिवारात सामील होत आहेत. ह्याचा प्रामुख्याने लाभ स्थळांनाच होत असतो. 

     कालानुरूप लग्न जमविण्यासाठी ४-५ संस्थांमध्ये तरी नाव नोंदणी करावी लागते. म्हणजे सर्व ठिकाणचे शुल्क भरण्याचा भुर्दंड पालकांना सोसावा लागतो. एवढे करूनसुद्धा त्या संस्थांमध्ये तीच तीच स्थळे आढळतात. हे असमाधानकारक असूनही नाईलाजास्तव पालकांना ते स्वीकारणे अपरिहार्य असते. हे दोष हेरून आम्ही विवाह संस्थांचा हा परिवार तयार केला आहे. 

     ह्या परिवाराची www.sumangalvivaha.com ही सामाईक वेबसाईट आहे. त्यामुळे कोणत्याही स्थळाने कोणत्याही एक संस्थेत नाव नोंदणी केली तरी ते स्थळ ह्या वेबसाईटवरही नोंदविले जाते. त्यामुळे कोणत्याही स्थळास परिवारातील सर्व संस्थांमध्ये नोंद होणाऱ्या सर्व स्थळांचा लाभ मिळतो आणि विशेष म्हणजे त्यासाठी फक्त एकाच संस्थेचे शुल्क भरावे लागते. त्यामुळे अनेक संस्थांमध्ये नाव नोंदणी करण्यासाठीचा आर्थिक भुर्दंड वाचतो. शिवाय प्रत्येक संस्थेशी निरनिराळा संपर्क साधण्यासाठीचा वेळ, श्रम आणि पैसाही वाचविता येतो. 

 उद्दीष्ट, वैशिष्ट्ये व कार्यपध्दती :

       वधूवरांचे विवाह जुळविणे ही खरी सद्यस्थितीतील ज्वलंत समस्या आहे. समाज सुशिक्षित होत चालला आहे तसतशा विवाहपूर्व व विवाहोत्तर संसारांमधील समस्याही वाढत चालल्या आहेत. पूर्वीचा ‘वरसंशोधन’ हा शब्दप्रयोग कालबाह्य झाला असून आता ‘वधूसंशोधन’ प्रचलीत झाले आहे. त्यामुळे सुयोग्य जीवनसाथी निवडण्यासाठी आता दोघांनाही विवाह संस्थेचा आधार घेणे अपरिहार्य झाले आहे. परिणामत: रोज नवनवीन विवाह संस्थाही जन्माला येत आहेत.

       पालकही अनेक संस्थांमधे आपल्या पाल्याचे स्थळ नाईलाजाने नोंदवतात. त्यासाठी भरमसाठ खर्चही करतात. परंतु बहुतेक ठिकाणी संपूर्ण समाधानकारक अशा अपेक्षित सेवा उपलब्ध नसतात. महत्त्वाचे म्हणजे स्थळांची माहिती आणण्यासाठी संस्थेत खेटे घालावे लागणे ह्या पारंपारिक पद्धतींपासून  आधुनिक वेबसाईट्सपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध असले तरी अपेक्षांची पूर्तता करणाऱ्या संस्था बोटावर मोजण्याइतक्यासुद्धा नाहीत.

      ह्या सर्व परिस्थितीचा साकल्याने विचार करून अपेक्षापूर्तीत उतरणारी, जास्तीतजास्त सोयींनी युक्त आणि निर्दोष अशी उत्कृष्ट वेबसाईट समाजासमोर मांडण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.

         ही नुसतीच विवाह जुळविणारी संस्था नसून विवाहासंबंधीत ज्योतिषशास्त्रीय शास्त्रशुद्ध  मार्गदर्शनासह अन्य अनेक उपयुक्त सुविधा सहज देता आल्या पाहिजेत हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन आपली कार्यपद्धती  निश्चित केलेली संस्था आहे.

      संस्थेतर्फे पुढील सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यातील कोणत्याही उपक्रमाची सविस्तर माहिती व तिचा उपयोग करण्यासंबंधी सूचना त्या सुविधेवर क्लिक केल्यावर मिळतील.

१)     वधूवरांची स्थळ  नोंदणी

२)     स्थळांची यादी

३)  वैयक्तिक गुणमेलन कोष्टक   

४)     वधूवर कुंडलीमेलन संपूर्ण अहवाल

५)     विवाहपूर्व मार्गदर्शन व समुपदेशन

६)     शुभमुहूर्तांची यादी

७)     वैयक्तिक पत्रिकेवरून मार्गदर्शन

८)     पतीपत्नींच्या पत्रिकांवरून मार्गदर्शन

९)     सहस्त्रचंद्रदर्शन अहवाल

१०) अन्य उपक्रम
 
 
 

Copyrights 2012. All Rights Reserved सुमंगल सुविधा विवाह संस्था  Website Designed and Developed by Kalpak Solutions