।। सुमंगल सुविधा ।।
विवाह संस्था, पुणे
संचालक : ज्योतिषपंडित डॉ. सुधीर दाते
 
ब्राह्मण विवाहसंस्था परिवारातील संस्था
प्रवर्तक : ज्योतिषपंडित डॉ. सुधीर दाते

विवाहविषयक अनेक उपक्रम करणारी एकमेव संस्था
स्थापना : जानेवारी २००६

Latest Event Details

-: विनम्र आवाहन :-

            सर्व वधू-वर, पालक 
आणि 
सर्व 
ब्राह्मण विवाह संस्था चालक 
ह्यांच्यासाठी 
विनम्र आवाहन. 
          'ब्राह्मण विवाह संस्था परिवार' हा नवीन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. अनेक विवाह संस्थांचा हा परिवार आहे. 
           ह्या उपक्रमामुळे वधूवर, पालक आणि विवाह संस्थासुद्धा ह्यांना अनेक लाभ मिळणार आहेत.  :-
१) परिवारातील कोणत्याही एका संस्थेत नाव नोंदणी केली तरी सर्व संस्थांमध्ये नोंदविल्या जाणाऱ्या सर्व स्थळाची माहिती उपलब्ध होईल. म्हणजेच अनेक संस्थांमध्ये नाव नोंदणी करण्याची गरज राहणार नाही. अर्थात आर्थिक बचत होईल. 
२) निरनिराळ्या संस्थांमध्ये नाव नोंदविल्यास त्यांच्याशी निरनिराळा संपर्क साधून स्थळे मिळवावी लागतात. परंतु अनेकवेळा तीच तीच स्थळे पाहायला मिळतात. ती ह्या योजनेत दिसत नाहीत. 
३) कोणत्याही संस्थेस परिवारातील सर्व स्थळांचा साठा उपलब्ध होतो. 
४} वधूवर मेळाव्यात अन्य संस्थेने दिलेल्या छापील  यादीतील स्थळांना संपर्क साधण्याचे काम नाहीसे होते. हा सर्व संस्थांना मिळणारा सरसकट लाभ आहे. 
५) मेळाव्यानंतर इतर संस्थांना छापील याद्या द्याव्या लागताच नाहीत. 
हे असे लाभ मिळवून धरणाऱ्या ह्या महत्त्वाकांक्षी योजनेत आपण अवश्य सहभागी व्हावे. ही नम्र विनंती. 
प्रवर्तक  :- ज्योतिषपंडित डॉ. सुधीर दाते, पुणे  

संपर्क :- ज्योतिषपंडित डॉ. सुधीर दाते ,  
मोबाईल : ९४२३००९६५२. 
 

सूचना : आपल्या स्थळाची माहिती नोंदविण्यासाठी 

"Register Now " वर क्लिक करा .

Register Now

वधूवरांची स्थळ नोंदणीची कार्यपद्धती :

१)   नाममात्र स्थळ नोंदणी : फक्त ब्राह्मण पोटशाखेतील कोकणस्थ, देशस्थ, कऱ्हाडे, शुक्ल यजुर्वेदीय, देवरुखे, दैवद्न्य ब्राह्मण, तसेच सरस्वत, गौड सरस्वत, गोमंतकीय वैश्य, ब्रम्ह वैश्य,  पोटजातीच्या वरास किंवा वधूस आपल्या अपेक्षांसहित संपूर्ण माहितीची नोंद विनाशुल्क करता येते. अशा स्थळास नाममात्र स्थळ म्हणून वर्गीकृत केले जाते. नाममात्र स्थळाने सशुल्क नोंदणी केलेली नसल्याने त्यास अपेक्षेत बसणाऱ्या स्थळाची माहिती वेब साईटवर पाहता येते. परंतु त्यात पत्ते, फोन नंबर, वगैरे माहिती दिसत नाही. परंतु त्याची माहिती मात्र जगभर सर्वत्र दिसते.   

२) सशुल्क स्थळ नोंदणी : शुल्क भरून स्थळ नोंदणी स्थळास सभासद स्थळ म्हणून वर्गीकृत केले जाते. त्यास Registration No. आणि Password दिला जातो. ह्याचा उपयोग करून अपेक्षेत बसणारी स्थळे  पत्ते, फोन नंबर, इ-मेलसह संपूर्ण माहितीसह  शोधता येतात. 

        म्हणजेच  सुयोग्य स्थळांची संपर्कासहित संपूर्ण माहिती हवी असल्यास शुल्क भरून सभासद व्हावे लागते. अशा सशुल्क सभासदांनाच फक्त संपर्कासाठी लागणाऱ्या संपूर्ण माहितीसह यादी उपलब्ध होते. 

३) योग्य वाटणाऱ्या स्थळांच्या पत्रिका आपल्या पत्रिकेशी  जुळतात की नाही हे स्वतःचे स्वतः पाहण्यासाठी मात्र आपल्याकडे संचालक डॉ. सुधीर दाते निर्मित  'वैयक्तिक गुणमेलन कोष्टक' असणे गरजेचे आहे. म्हणजे मग  त्या कारणासाठी आपणास ज्योतिषाकडे जावे लागणार नाही आणि गैरसमजुतीने स्थळेही हातची जाणार नाहीत. जास्त माहितीसाठी आमच्या 'वैयक्तिक गुणमेलन कोष्टक' ह्या उपक्रमाची माहिती वाचा.

४) स्थळनोंदणीचे एकूण पाच प्रकार केलेले आहेत. त्यानुसार त्यांची शुल्क रचना आहे.

 
 प्रकार १ :
सर्वसामान्य स्थळ                                               २४५०/- रु.  

 प्रकार २ : घटस्फोटित, जास्त वयाची स्थळे (वर ४० वर्षे , वधू ३५ वर्षे  )                                                                                                     १९५०/- रु.     

 प्रकार ३ : विधवा, विधूर, अल्पशिक्षित (१२वी पर्यंत) स्थळे      १०५०/- रु.

 प्रकार ४  :  जास्त वयाची परंतु अल्पशिक्षित स्थळे :                  ७५०/- रु.

 प्रकार ५ :  सव्यंग स्थळे                                                        ५५०/- रु.

      वर नमूद केलेले शुल्क फक्त एकदाच भरायचे असून नोंदणीकृत सभासदात्त्वाची कालमर्यादा विवाह जुळेपर्यंत असते. 

  
 
  
५) सशुल्क नोंदणीचे शुल्क भरण्यासाठी पुढील पर्याय उपलब्ध आहेत.
 

 १.     
संस्थेच्या बँक खात्यावर रक्कम जमा करता येईल. 
 
२.     संस्थेत रोख भरणा करता येईल.


 
 
 

Copyrights 2012. All Rights Reserved सुमंगल सुविधा विवाह संस्था  Website Designed and Developed by Kalpak Solutions