।। सुमंगल सुविधा ।।
विवाह संस्था, पुणे
संचालक : ज्योतिषपंडित डॉ. सुधीर दाते
 
ब्राह्मण विवाहसंस्था परिवारातील संस्था
प्रवर्तक : ज्योतिषपंडित डॉ. सुधीर दाते

विवाहविषयक अनेक उपक्रम करणारी एकमेव संस्था
स्थापना : जानेवारी २००६

Latest Event Details

-: विनम्र आवाहन :-

            सर्व वधू-वर, पालक 
आणि 
सर्व 
ब्राह्मण विवाह संस्था चालक 
ह्यांच्यासाठी 
विनम्र आवाहन. 
          'ब्राह्मण विवाह संस्था परिवार' हा नवीन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. अनेक विवाह संस्थांचा हा परिवार आहे. 
           ह्या उपक्रमामुळे वधूवर, पालक आणि विवाह संस्थासुद्धा ह्यांना अनेक लाभ मिळणार आहेत.  :-
१) परिवारातील कोणत्याही एका संस्थेत नाव नोंदणी केली तरी सर्व संस्थांमध्ये नोंदविल्या जाणाऱ्या सर्व स्थळाची माहिती उपलब्ध होईल. म्हणजेच अनेक संस्थांमध्ये नाव नोंदणी करण्याची गरज राहणार नाही. अर्थात आर्थिक बचत होईल. 
२) निरनिराळ्या संस्थांमध्ये नाव नोंदविल्यास त्यांच्याशी निरनिराळा संपर्क साधून स्थळे मिळवावी लागतात. परंतु अनेकवेळा तीच तीच स्थळे पाहायला मिळतात. ती ह्या योजनेत दिसत नाहीत. 
३) कोणत्याही संस्थेस परिवारातील सर्व स्थळांचा साठा उपलब्ध होतो. 
४} वधूवर मेळाव्यात अन्य संस्थेने दिलेल्या छापील  यादीतील स्थळांना संपर्क साधण्याचे काम नाहीसे होते. हा सर्व संस्थांना मिळणारा सरसकट लाभ आहे. 
५) मेळाव्यानंतर इतर संस्थांना छापील याद्या द्याव्या लागताच नाहीत. 
हे असे लाभ मिळवून धरणाऱ्या ह्या महत्त्वाकांक्षी योजनेत आपण अवश्य सहभागी व्हावे. ही नम्र विनंती. 
प्रवर्तक  :- ज्योतिषपंडित डॉ. सुधीर दाते, पुणे  

संपर्क :- ज्योतिषपंडित डॉ. सुधीर दाते ,  
मोबाईल : ९४२३००९६५२. 
 

वैयक्तिक गुणमेलन कोष्टक                          

          विवाह जमविण्याच्या प्रक्रियेत पत्रिका जुळण्याचा अडथळा पार करण्यासाठी भरपूर श्रम,  वेळ व पैसा खर्च होतो. त्याची मुख्यत: कारणे म्हणजे –

१)     पत्रिका जुळतात की नाही बघण्यासाठी ज्योतिषावर अवलंबून रहावे लागते. स्वत:ला ज्योतिषशास्त्राचे ज्ञान नसल्याने ज्योतिषाने दिलेल्या निर्णयावर (अंध) श्रद्धा  ठेवावी लागते. त्यांच्याकडूनही योग्य सल्ला मिळेलच ह्याची खात्री नसते.

२)     न जुळणाऱ्या स्थळांकडे पत्रिका देण्यासाठी व ‘जमत नाही’ असे ऐकण्यासाठी असा निष्कारण दोन-दोन वेळा संपर्क साधावा लागतो. त्यासाठी फोनचा किंवा जाण्यायेण्याचा प्रवास खर्च येतो व वेळही वाया जातो.

३)     जनमानसात अनेक गैरसमजुती प्रचंड प्रमाणात फैलावलेल्या आहेत. एक नाडी असल्यास पत्रिका जमत नाहीत, ३६ गुण असल्यास विवाह करू नये, मंगळाच्या जोडीदारास मंगळाचाच जोडीदार लागतो, मृत्यूषडाष्टक असू नये, १८ पेक्षा कमी गुण चालत नाहीत हे आणि अशा प्रकारचे प्रघात समाजात चुकीच्या पद्धतीने  वापरात आहेत. परिणामत: कित्येकवेळा जुळणारी स्थळेही हातातून निसटतात.

४)   गुणमेलन पाहताना  दाते पंचांगातील तीन कोष्टके पहावी लागतात हे पुष्कळदा माहितीच नसते. माहिती असले तरी ही  तीनही कोष्टके संदर्भास घेऊन गुणमेलन पहाणे सामान्यास जमत नाही. ह्या सर्व समस्यांचा सातत्याने व साकल्याने विचार करून, प्रत्येक नक्षत्र – चरणासाठी एक ह्याप्रमाणे वधूंसाठी १०८ व वरांसाठी १०८ अशी एकूण २१६ गुणमेलन कोष्टके मी स्वत: बनविलेली आहेत. विवाहेच्छू व्यक्तीने स्वत: जवळ स्वत:साठीचे वैयक्तिक गुणमेलन कोष्टक बाळगल्यास संस्थांकडून स्थळे शोधताना फक्त पत्रिका जुळणारीच स्थळे निवडणे सहज शक्य होते. ह्यामुळे श्रम, वेळ, पैसा ह्यांची लक्षणीय बचत होते. तसेच दुसऱ्या पक्षाकडून आलेल्या पत्रिका त्वरीत आणि योग्य निर्णय घेऊन निकालात काढता येतात व दुसऱ्याचेही कष्ट वाचविता येतात.

विशेष म्हणजे हे कोष्टक बघणाऱ्यास ज्योतिषशास्त्र येण्याची आजिबात आवश्यकता नसते. अशा ह्या कोष्टकासोबत (१) वधूच्या किंवा वराच्या बिनचूक पत्रिकेचे दुसऱ्या पक्षास देण्यासाठी पत्रिकेचे शास्त्रशुद्ध टिपण , (२)मंगळदोषाबाबत आपल्या स्वतःच्या पत्रिकेत काय परिस्थिती आहे ह्या संबंधी सूचना, (३) कोष्टकाचा उपयोग कसा करावा ह्याचे विवेचन ह्यांचाही समावेश असतो. 

कोष्टकाची  करणावळ ५००/- रु. आहे. ‘सुमंगल सुविधा’ संस्थेत सशुल्क स्थळ सशुल्क नाव नोंदणी केलेल्यांना हे कोष्टक मोफत दिले  जाते.असे कोष्टक बनवून हवे असल्यास संस्थेशी संपर्क साधावा. 

मोबाईल : ९४२३००९६५२      
 
 
 

Copyrights 2012. All Rights Reserved सुमंगल सुविधा विवाह संस्था  Website Designed and Developed by Kalpak Solutions